3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली होती. या २०२३-२४ आर्थिक वर्षात ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी यातील पात्रतेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शुद्धीपत्रक येथे पहा. ही योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.
- शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023
- अनुदान कशासाठी किती दिले जाणार
- अर्ज कसा व कोठे करायचा?
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंमलबजावणीसाठी 2023 मध्ये काय सुधारणा केल्या आहेत ?
- 1. What is the Sharad Pawar Gram Samruddhi Yojana 2023?
- 2. What are the four specific activities eligible for funding under Sharad Pawar Gram Samruddhi Yojana?
- 3. How much funding is provided for each of these activities under Sharad Pawar Gram Samruddhi Yojana?
- 4. How and where can I apply for the Sharad Pawar Gram Samruddhi Yojana?
- 5. Which documents are required for the application?
- 6. How should I select the appropriate category for my family?
- 7. If my family owns agricultural land, what documents should I submit?
- 8. Do I need to submit a residential proof if I am a resident of the same village?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये…
- गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणं
- शेळीपालनासाठी शेड बांधणं
- कुक्कुटपालनासाठी शेड बांधणं
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
अनुदान कशासाठी किती दिले जाणार
- गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम – यात 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे. 6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
- शेळीपालन शेड बांधकाम – 10 शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरता तिप्पट अनुदान दिलं जाणार आहे. पण, अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
- कुक्कुटपालन शेड बांधकाम – 100 पक्ष्यांकरता शेड बांधायचं असेल तर 49, 760 अनुदान दिलं जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे. पण, समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर यंत्रणेनं शेड मंजूर करावं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणं बंधनकारक राहिल.
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग – शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
आता या चारही कामांमधील बांधकामासाठी लांबी, रुंदी जमिनीचं क्षेत्रफळ किती असावं याची माहिती शासन निर्णयात सविस्तर दिली आहे.
अर्ज कसा व कोठे करायचा?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. यासंबंधीच्या अर्जाचा नमुना असा असेल.
इथं सुरुवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करायची आहे. त्याखाली ग्रामपंचायतचं नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे दिनांक टाकून फोटो चिकटवायचा आहे.
त्यानंतर अर्जदाराचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.
तुम्ही पाहू शकता की मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची इथं यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यानं नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्यांचं कॉंक्रीटिकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवं त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.
इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इथं प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडायचा आहे. यात अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचीत जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे.
तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडायचा आहे.
लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का, असल्यास हो म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे.
लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडायचा आहे. तसंच तुम्ही निवडलेलं काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, ते सांगायचं आहे.
अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षावरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहायची आहे.
शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- वयक्तिक लाभाच्या योजनेसाठीचा विहित नमुन्यातील भरलेला अर्ज.
- सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9
- रहिवासी दाखला
- घोषणापत्र
- मनरेगाचं जॉब कार्ड
- ग्रामसभेचा ठराव
- सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं शिफारस पत्र
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंमलबजावणीसाठी 2023 मध्ये काय सुधारणा केल्या आहेत ?
या शासन निर्णयानुसार गाय व म्हैस यांच्याकवरता पक्का गोठा बांधण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार गोठ्ठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगगग आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले होते. परंतु बँकऋण घेऊन अथवा पशुसंवर्वाधन अथवा अन्य विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाय, म्हैस यांना टॅग करण्यता येते. तथापि, स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना टॅग नसल्याने गोठे देण्यासंदर्भात अडचणी निर्माण होत असल्याचे व परिणामी लाभाथी पात्र असूनदेखील या योजनेतील लाभापासून वंचित राहत असल्याचे दिसून आल्याने टॅगींग ची अट रद्द करून त्याऐवजी संबंधीत ग्रामसेवक / तांत्रिक सहाय्यक / ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन लाभार्थ्यांकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमावणत करावी. पंचनामा करतांना ग्रामसेवक, व जिल्पहा परिषद शाळेचे शिक्एषकांपैकी एक अथवा इतर शासकीय कर्मचाऱ्यापैकी कोणीही एक हजर असणे आवश्यक राहील असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन शुद्धीपत्रक येथे वाचा.
1. What is the Sharad Pawar Gram Samruddhi Yojana 2023?
A1: The Sharad Pawar Gram Samruddhi Yojana is a scheme launched under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act (MGNREGA) that aims to integrate various initiatives for rural development.
2. What are the four specific activities eligible for funding under Sharad Pawar Gram Samruddhi Yojana?
A2: The eligible activities for funding under the scheme include:
- Construction of concrete shelters for cows and buffaloes
- Construction of sheds for sheep rearing
- Construction of sheds for poultry farming
- Bio-composting using the Naadeep method for soil rejuvenation
3. How much funding is provided for each of these activities under Sharad Pawar Gram Samruddhi Yojana?
A3: The funding details for each activity are as follows:
- Construction of concrete shelters for cows and buffaloes: An amount of INR 77,188 is provided for constructing one shelter for 2 to 6 animals. Additional funding is available for more animals.
- Construction of sheds for sheep rearing: An amount of INR 49,284 is provided for constructing 10 sheds. Additional funding is available for more sheds.
- Construction of sheds for poultry farming: An amount of INR 49,760 is provided for constructing 100 sheds. Additional funding is available for more sheds.
- Bio-composting using the Naadeep method: An amount of INR 10,537 is provided for implementing composting techniques.
4. How and where can I apply for the Sharad Pawar Gram Samruddhi Yojana?
A4: To avail the benefits of the scheme, you need to submit an application at the Gram Panchayat office. The application should include the required information as specified in the government’s decision. The application format should include details such as the name of the Gram Panchayat, Taluka, and District. You also need to attach a recent photograph with a date stamp.
5. Which documents are required for the application?
A5: The application should include your name, address, Taluka, District, and mobile number. You need to specify the activity for which you are applying and provide the necessary supporting documents..
6. How should I select the appropriate category for my family?
A6: You need to select the category that best suits your family’s circumstances. The categories include Scheduled Caste, Scheduled Tribe, Nomadic Tribe, De-notified Tribe, Economically Weaker Section, Women-headed Household, Physically Challenged, Landless Laborer, and beneficiaries of Bhushan Yojana and Indira Awas Yojana. Select the category that corresponds to the type of residency your family belongs to.
7. If my family owns agricultural land, what documents should I submit?
A7: If your family owns agricultural land, you need to provide the land documents, such as 7/12 extract, 8A, and a Village Panchayat certificate.
8. Do I need to submit a residential proof if I am a resident of the same village?
A8: Yes, you need to submit a residential proof document even if you are a resident of the same village. The document required is known as the “Rahivasi Dakhala” (residence certificate) and should be included with your application.