जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची. प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभाग राबवणार अभियान. ७५ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ. – Jatra Shasakiy Yojananchi.
सामग्री सारणी
प्रस्तावना –
कृषी विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र व राज्य शासनाकडून वर्षभरात वार्षिक कृती आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने निधी वाटप करण्यात येतो. परंतु कृषी क्षेत्राचे कामकाज हे हंगामनिहाय चालते आणि यामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ७५% क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड करण्यात येते. त्यामुळे खरीप हंगाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. याच पार्श्वभूमीवर खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना शेतीकरीता आवश्यक बाबींच्या खरेदीसाठी व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कृषी विभागाच्या विवध योजनांच्या माध्यमातून वेळीच अर्थसाहाय करता यावे तसेच शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करता यावी याकरीता “जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची” हे अभियान कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
अभियानाचा कालावधी –
अंमलबजावणी आरंभ – 15 एप्रिल २०२३
पूर्वतयारी – 15 एप्रिल २०२३ ते 15 मे २०२३
अंमलबजावणी कालावधी – 15 एप्रिल २०२३ ते 15 जून २०२३.
अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजानांची यादी –
केंद्र पुरस्कृत योजना –
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पिक
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – कृषी यांत्रिकीकरण
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – मृदा आरोग्य व सुपिकता
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – परंपरागत कृषी विकास योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास
- कृषी उन्नती योजना – राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान
- कृषी उन्नती योजना – राष्ट्रीय खाद्यतेल अवियान
- कृषी उन्नती योजना – बियाणे व लागवड साहित्य उपभियान
- कृषी उन्नती योजना – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- कृषी उन्नती योजना – कृषी विस्तार
- आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य कृषी उन्नयन योजना
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थ्यांच्या माहितीत दुरुस्ती करणे
राज्य पुरस्कृत योजना –
- पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प
- किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादन शेतकऱ्यांना देण्याबाबत.
- सेंद्रिय/विषमुक्त शेती योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
- राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना
- मुख्यमंत्री कृषि व अन्नप्रक्रीया योजना
- जिल्हा कृषि महोत्सव योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
- पिक स्पर्धा
- कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
- भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड योजना
- कृषि सेवा केंद्रांचे परवाने देणे
अभियानासंदर्भात शासन निर्णय / Government Resolution येथे पहा –शासन निर्णय