कृषि विभागा मार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता मागेल त्याला मिळणार फळबाग / ठिबक / तुषार सिंचन / शेततळे / शेततळ्याचे अस्तरीकरन / शेडनेट / हरितगृह / आधुनिक पेरणीयंत्र (BBF) / कॉटन श्रेडर
प्रस्तावना –
शेतकरी बांधवांनो या आर्थिक वर्षासाठी २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाने कृषि विभागामार्फत मागेल त्याला फळबाग / ठिबक / तुषार सिंचन / शेततळे / शेततळ्याचे अस्तरीकरन / शेडनेट / हरितगृह / आधुनिक पेरणीयंत्र (BBF) / कॉटन श्रेडर देण्याचे घोषित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल. प्राप्त अर्जांपैकी पात्लॉर शेतकऱ्टयांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे जर आपणाला लाभ घ्यायचा असेल तर घाई करा आणि लवकर अर्ज करा.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषि विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध घटकांचा लाभ देण्यात येतो.
शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या घटक / बाबी त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे २०१५ साली शासनाने सुरु केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात आला असून आता २२०२३-२४ सालासाठी मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे / शेततळ्याचे अस्तरीकरन / शेडनेट / हरितगृह / आधुनिक पेरणीयंत्र (BBF) / कॉटन श्रेडर हे घटक देण्याचे ठरले आहे. या विविध योजनांकरीता या वर्षाकरीता १ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नियोजित लाभ घटक / बाब व योजनांबद्दलची माहिती –
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारऱ्या घटक / बाबी मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागेल त्याला आवश्यक असलेले घटक मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या अनुर्षंगाने सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे / शेततळ्याचे अस्तरीकरन / शेडनेट / हरितगृह / आधुनिक पेरणीयंत्र (BBF) / कॉटन श्रेडर देण्याचे ठरले आहे.
शेतकऱ्यांना सदर घटक / बाबी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजानांच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :
अ.क्र. | घटक/ बाब | कृषि विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या प्रचलित योजना |
१ | मागेल त्याला फळबाग | १) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
२ | मागेल त्याला ठिबक /तुषार सिंचन | राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) |
३ | मागेल त्याला शेततळे | मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना |
४ | मागेल त्याला शेततळ्यांचे अस्तरीकरण | १) राष्ट्रीय कृषि विकास योजना २) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ३) मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना ४) बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना |
५ | मागेल त्याला शेडनेट / हरितगृह | १) मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना २) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ३) राष्ट्रीय कृषि विकास योजना |
६ | मागेल त्याला आधुनिक पेरणीयंत्र (BBF) / कॉटन श्रेडर | १) कृषि यांत्रिकीकरण उपअभियान २) राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना |
ठळक घोषवारा –
- शेतकऱ्यांना २०२३-२४ या वर्षात फळबाग / ठिबक / तुषार सिंचन / शेततळे / शेततळ्याचे अस्तरीकरन / शेडनेट / हरितगृह / आधुनिक पेरणीयंत्र (BBF) / कॉटन श्रेडर इत्यादींसाठी मिळणार अनुदान.
- महाडीबीटी Mahadbt पोर्टलवर करावा लागणार अर्ज. – येथे करा अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
- मागणी करायच्या घटकाचा यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल तर असा शेतकरी पात्र असणार नही.
- पात्र व लॉटरी पद्धतीने विजयी लाभार्थ्यांना सर्व निकष पूर्ण केल्यावर ठरवण्यात आलेली अनुदान रक्कम त्यांच्या आधार क्रमांकाशी सलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
Great delivery. Great arguments. Keep up the amazing effort.